Thursday, September 10, 2009


…..आवाज तुम्ही ऐकलाय का?


तुमच्या डाव्या हातात सिगरेट अन्
उजव्या हातात ग्लास दारूचा
चाळणी झालेले फुफूस अन्
गुदमरून घाबरलेल्या ह्र्दयाचा
आवाज तुम्ही ऐकलाय का?
पूर्वी तुमच्या शरीरात सळसळणारे रक्त
आता रंग बदलल्याने हळहळते
एक दिवस सिगरेट नाही ओढली तर
तुमच्या कालवणा-या पोटाचा
आवाज तुम्ही ऐकलाय का?
सुखाचा वर्षाव असो वा दुखःचा घाव
तुम्हाला दारू पिण्यासाठी सबबी हव्या असतात
दारू सगळ्या सारख्याच फक्त बाटल्या नव्या असतात
दारूने भुरळ पाडलेल्या मेंदूचा
आवाज तुम्ही ऐकलाय का?
सिगारेटच्या प्रत्येक झुरक्यागणिक
ह्रदयाच्या भिंती जवळ येऊ लागल्या आहेत
पूर्वी प्राणवायू पुरवणा-या ह्या फुफूसाच्या
भूमिका आता वेगवेगळ्या आहेत
अशा धुराचे साम्राज्य बनलेल्या फुफूसाचा
आवाज तुम्ही ऐकलाय का?
तुम्ही तुमच्या जवळ्च्या व्यक्तींनादेखील
काही अंशी धुराचे नजराणे भेट करताय
जवळच्या व्यक्तींपासून लांब जाण्याची
पुरेपुर तयारी तुम्ही थेट करताय

तुम्ही ज्यांच्यासाठी सर्वस्व असलेल्या व्यक्तींचा
आवाज तुम्ही ऐकलाय का?
हे सगळे तुम्ही कुठे ना कुठे वाचले आहे
हे सगळे मेंदूमध्ये कुठे ना कुठे साचले आहे
कळतंय पण वळत नाही अशा विचाराने
निरोगी आयुष्य जगायचे अशा निर्धाराने
तुमच्या चंचल मनाला साद घालून बघा
तिकडून येणारा प्रतिसाद चाचपडून बघा
आणि मग मला न विसरता सांगा
तुमच्या मनाचा आवाज तुम्ही ऐकलाय का?

मित्रा मला तुझी फार काळजी वाटते, त्याच काळजीपोटी पोटतिडकीने ही कविता
लिहीत आहे.

तुमचा कवीमित्र - संतोष
6th August 2009

Monday, August 17, 2009

मित्रांची आठवण येत नाही का रे?

आपला काही मोजक्याच मित्रांचा ग्रुप होता ना रे
हाताच्या बोटांवर मोजण्याइतका
मग हाताची बोटे बघितल्यावर मित्रांची आठवण येत नाही का रे?
आपला काही मोजक्याच मित्रांचा ग्रुप होता ना रे
डोळ्यांची पारणे फिटतील असा
मग आरशात डोळे बघितल्यावर मित्रांची आठवण येत नाही का रे?
आपला काही मोजक्याच मित्रांचा ग्रुप होता ना रे
भावी आयुष्याची एकत्र स्वप्न बघणारा
मग आज स्वप्न बघितल्यावर मित्रांची आठवण येत नाही का रे?
आपला काही मोजक्याच मित्रांचा ग्रुप होता ना रे
अम्रूततुल्य मध्ये चहा पिऊन दिवसाची सुरूवात् करणारा
मग आज चहा पिताना मित्रांची आठवण येत नाही का रे?
आपला काही मोजक्याच मित्रांचा ग्रुप होता ना रे
वेळात वेळ काढून एकमेकांच्या डिफिकल्टीज सोडवणारा
मग आज घड्याळात बघितल्यावर मित्रांची आठवण येत नाही का रे?
आपला काही मोजक्याच मित्रांचा ग्रुप होता ना रे
एकाच जागेवर तासंतास बसून क्रिकेट मैच बघणारा
मग जागा बदलून विकेट पडल्यावर मित्रांची आठवण येत नाही का रे?
आपला काही मोजक्याच मित्रांचा ग्रुप होता ना रे
अभ्यासासाठी रात्र रात्र जागणारा
मग आज डोळे चुरचुरल्यावर तरी मित्रांची आठवण येत नाही का रे?
आपला काही मोजक्याच मित्रांचा ग्रुप होता ना रे
मैत्री खातिर कुछ भी अशा आणा भाका घेणारा
मग आज फ्रेंडशिपडे ला तरी मित्रांची आठवण येत नाही का रे?
आपला काही मोजक्याच मित्रांचा ग्रुप होता ना रे
करीअरविषयी कट्ट्यावर मनसोक्त गप्पा मारणारा
मग आज सेटल झाल्यावर तरी मित्रांची आठवण येत नाही का रे?
आपला काही मोजक्याच मित्रांचा ग्रुप होता ना रे
ह्या "मोजक्या" मधले किती मित्र एकमेकांना जमेत धरतो
मग आज ही कविता वाचल्यावर तरी "मोजक्या" मित्रांची आठवण येइल का रे?
- संतोष
4th August 2009