
ओला ढग, ओला पाऊस ओलाच थेंब
मी ही ओला अन ती ही ओली चिंब
ओली पाने, ओले पक्षी ओलीच माती
मी तिच्या मिठीत आणि माझ्या ती
ओले मन, ओले विचार आणि ओलेच प्रेम
ओल्या सरी ओघळण्यासाठी अंतर जेमतेम
ओला डोंगर ओला समुद्र ओलेच आकाश
ओले ओठ ओले गाणे ओलाच श्वास
ओला दिवस ओला सहवास ओलीच सांज
ओले डोळे ओले आसू विरह ही ओलाच
ओली गर्दी ओला प्रवास ओलाच विलंब
ओल्या घरी पोहोचायला ओलीच सबब
ओला ओरडा अन आईच्या काळजीचा ओलावा
मी भिजले नसल्याचा ओलाच दिखावा
भिजलेले कपडे सुखतीलही
पण विसरू कशी तुझी ओली आठवण?
म्हणूनच पुन्हा ओले होण्यासाठी
देते पावसाला उद्याचे ओले निमंत्रण